मुंबई- भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बिहारी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. धसांच्या त्या वक्यव्यामुळे उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून धस यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे यांनी धस यांना चपलेने मारणाऱ्याला ११ हजारांचे बक्षीस दिल्या जाईल असे म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकार व महिला
आयोगाने या आमदारांच्या वक्त्यव्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अन्यथा
येत्या २ दिवसांत धस यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी मुंबईच्या भाजप कार्यालयावर
विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दुबे यांनी दिला आहे.
















